प्रतिनिधी-एस.ए.तुपे
श्रीरामपूर पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अत्यंत गोपनीय आणि केवळ शासकीय कामासाठी असलेले लॉगीन आयडी व पासवर्ड अनधिकृतपणे काही ठराविक खाजगी केंद्रांना वितरित केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात पत्रकार प्रदीप जाधव आणि सुधिर तुपे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रशासकीय शिस्तीचा भंग करणाऱ्या या कृतीमुळे लाभार्थ्यांच्या माहितीची सुरक्षा धोक्यात आली असून आयटी ॲक्टचे उल्लंघन झाले आहे. शासकीय काम खाजगी दुकानांत गेल्यामुळे गरीब महिलांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता असून यामुळे बाजारात मक्तेदारी निर्माण झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वितरित केलेले सर्व आयडी तात्काळ निष्क्रिय करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा वरिष्ठ स्तरावर दाद मागण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments